ऍड

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

मकर संक्रांत

    मकर संक्रांती(14 जानेवारी ) पासुन सूर्य उत्तरायण होते. म्हणजेच दक्षिणेपासुन उत्तर गोलार्धाच्या दिशेला येणे सुरु होते. यामुळे रात्र लहान आणि दिवस मोठा होऊ लागतो. धर्म ग्रंथांमध्ये उत्तरायणला देवतांचा दिवस देखील म्हटले जाते.

                          काय आहे उत्तरायण, जाणुन घ्या..
ज्योतिष शास्त्राप्रमाणे, सुर्य 30-31 दिवसात राशीत परिवर्तन करतो.
 सूर्याचा मकर राशित प्रवेश धार्मिक दृष्टिने खुप शुभ मानला जातो. 
मकर संक्रांती अगोदर सुर्य दक्षिण गोलार्धामध्ये असतो म्हणजेच भारतापासुन दूर. 
यावेळी सुर्य दक्षिणायन असतो. 
याच कारणामुळे येथे रात्र मोठी आणि दिवस लहान असतात तसेच हिवाळा असतो.
 मकर संक्रांतीपासुन सूर्य उत्तर गोलार्धात येणे सुरु होते. 
या दिवसापासुन रात्र लहान आणि दिवस मोठे होऊ लागतात
याला उत्तरायण म्हटले जाते.

                                                मकरसंक्रांतीस यात्रा
मकरसंक्रांतीस अनेक यात्रा आयोजित होतात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात कुंभमेळा जो दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व नासिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो. याखेरिज गंगासागर येथे, कोलकाता शहरानजिक गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते. केरळच्या शबरीमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते.

                                              पुराणातील उत्तरायण
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म ज्यांना इच्छामरणाचे वरदान होते, त्यांनी बाणांच्या शय्येवर पडून राहून या दिवशी देह त्याग केल्याचे सांगितले जाते. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा शुभ मानला जातो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा