ऍड

गुरुवार, २९ मार्च, २०१८

श्री मारुती स्तोत्र

                                                 ।। श्री ।।
 श्री मारुती स्तोत्र 
                                                 
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी (शोकहर्ता) (धूर्त) दूत वैष्णव गायका ॥२॥
दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥
ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥
ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे ।
मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥१०॥
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरु- मांदार धाकुटे ॥११॥
ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके ।
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥
धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥१५॥
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकला गुणें ॥१६॥
रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥१७॥
॥इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम ॥

॥ श्री मारुतिस्तोत्रम् संपूर्णम् ॥

या हनुमान जयंती ला हे नक्की करा

                                                                 ।।श्री ।।
                                                          श्री हनुमान प्रसन्न 

                      हनुमान जयंती ३१ मार्च ला आहे

प्राचीन काळापासून प्रत्येक युगामध्ये हनुमानची पुजा आणि भक्ती करणाऱ्य़ांची मनोकामना जरूर पूर्ण होत आली आहे. शास्त्रीय आधारानुसार तीन युगे आहेत. आता कलीयुग सुरू आहे. ग्रंथाच्या आधारानुसार कलीयुगात देवाचे नाव घेतल्याने आपले पाप नष्ट होते. त्यासाठी पुजाअर्चा करण्याची गरज आहे. ही पुजाअर्चा केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात.आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी हनुमान मदत करतो. ज्याच्यावर हनुमंत प्रसन्न होतो, त्याच्यावरील संकट तात्काळ दूर होते आणि सुख तसेच संपत्ती प्राप्त होते. 
उपाय १
हनुमंताचे अनेक विविध प्रकारात प्रतिमा उपलब्ध आहेत. शास्त्रीयआधारानुसार पुजेचे वेगळे महत्व सांगितले जाते. ज्याप्रकारच्या प्रतिमेंचे पुजन केले जाते, तसे प्रत्येकाला फळ मिळते. म्हणजेच हनुमान प्रसन्न होतो.
ज्याला धन आणि संपत्तीबरोबर सुख पाहिजे त्यांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची आराधना करणाऱ्या हनुमानाची पुजा केली पाहिजे. वायुपुत्र भक्तीची प्रतिमा असलेल्या हनुमानाची पुजा केली असता हनुमान प्रसन्न होतो. तसेच श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हेही प्रसन्न होतात. या देवतांच्या कृपेमुळे आपले संकट टळते शिवाय सौभाग्य प्राप्त होते. तंत्र ज्योतिषशास्त्रात अनेक चमत्कारिक उपाय सांगितले आहेत.


उपाय २
त्यापैकी एक उपाय आहे, जो केल्याने हनुमान स्वप्नात येऊन तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीचा आशीर्वाद देतील. हे अनुष्टान ८१ दिवसाचे आहे. हनुमान जयंती ३१ मार्च ला आहे, त्यामुळे या दिवसापासून या अनुष्ठानाची सुरुवात करावी.
हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य कर्म झाल्यानंतर, शुभ्र वस्त्र परिधान करा. एका तांब्यात पाणी घेऊन हनुमानाच्या मंदिरात जा आणि त्या पाण्याने हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक करा. पहिल्या दिवशी उडदाची एक डाळ हनुमानाच्या डोक्यावर ठेऊन आकरा प्रदक्षिणा घाला, आणि मनातल्या मनात तुमची इच्छा हनुमानासमोर सांगा. नंतर उडदाची डाळ घरी घेऊन या, व वेगळ्या ठिकाणी ठेवा.
दुसर-या दिवशीपासून हीच प्रक्रिया करत राहा. ४१व्या दिवशी ४१ उडदाचे दाणे ठेऊन ४२ व्या दिवसापासून एक एक डाळ कमी करत जा. ८१ दिवसाहे हे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर हनुमान स्वप्नात दर्शन देऊन तुमच्या इच्छापूर्तीचा आशीर्वाद तुम्हाला देतील.



उपाय ३
उपाय ४
आपल्या जीवनात समस्या येऊ नये असे वाटत असेल तर हनुमान मंत्राचा
जप तुम्ही दर मंगळवारी देखील करु शकता.

पुढील मंत्र करा. -

मंत्र १
 ऊँ नमो हनुमते रूद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा.

मंत्र २
हं हनुमंते रुद्रात्मकाय हुं फट 

मंत्र ३
मनोजवं मारुती तुला वेगम , जितेंद्रियं बुद्धिमत्ता वारिष्टम,
वातत्मजं  वानर युथ मुख्यम , श्री राम दूतं  शरणं प्रपद्ये .





टीप :
सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून स्वछ कपडे घालून आई- वडिलांना आणि गुरूला नमस्कार करून आसनावर बसा.पारद हनुमानाच्या असलेल्या फोटो समोर बसून हा जप केल्याने विशेष फळाची प्राप्ती होण्यास मदत होते. जप करण्याकरता लाल रंगाच्या माळेच्या उपयोग करावा.


या हनुमान जयंती ला हे नक्की करा

राणे गुरुजी ( पालघर  ) 
८१४९३५७८९०

बुधवार, २८ मार्च, २०१८

जेवणावर चुकूनही या गोष्टी करू नका

                                                                     ।। श्री ।।
                                            ।। श्री गणेशाय नमः ।। अन्नपूर्णा माता प्रसन्न ।।

                ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते.
              
          घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खात-पीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो.
           
            गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात. मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार ? एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते. त्यासाठी असे प्रकार करू नका.
          
           मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात. यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो.

          अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे-पिणे करू नये.

          मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. ‘अतिथी देवो भव’ ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सहीसलामत सुटका होते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत राहते. स्वतःची अध्यात्मिक शक्तीही वाढते.



नोट : वरील लेखातून मला कोणतीही अंधश्रद्धा पसरवायची नाही 


अधिक माहिती साठी संपर्क 
८१४९३५७८९०

सोमवार, १९ मार्च, २०१८

जाणून घ्या चैत्र महिन्याचे भविष्य

                                                                 ।।श्री ।।

                                         नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 


               शालिवाहन शके १९४० , विलंबी नाम संवत्सर , चैत्र महिना 

                           

              चैत्र महिना १८ मार्च ते १६ एप्रिल पर्यंत आहे 


मेष राशी : या महिन्यात नोकरीत दगदग वाढेल . अपमानाचे प्रसंग येतील , व्यापारात थोडी मंदी जाणवेल , आर्थिक परिस्थिती खालावेल , काटकसरीने वागा . घरातील लोकांचे सहकार्य लाभेल . नव्या घराचा व्यवहार जमून येईल . उद्योग धंद्यात वाद टाळा . धार्मिक कार्यात दुर्लक्ष होईल , इतरांची मने दुखावतील असे बोलणे टाळावे . आरोग्य चांगले राहील .
अनुकूल दिवस - मार्च { २४,२५,३१ } एप्रिल { १,९,१०,११,१२,१३}
प्रतिकूल दिवस - मार्च { १८,१९,२६,२७ } एप्रिल  { ४,५,१४,१५}

वृषभ राशी : राहत्या घराचं प्रश्न मिटतील . व्यापारात आपली प्रतिमा उजळून निघेल . आर्थिक प्राप्ती चांगली राहील , योग्य ठिकाणी गुंतवणूक करा . शेतजमिनीत वाढ करण्यास हरकत नाही . नोकरीत नवे क्षेत्र खुले होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका . स्थावरचे व्यवहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा . प्रवास दगदगीचे होतील. अध्यात्माकडे ओढा वाढेल.
अनुकूल दिवस - मार्च { १८,१९,२६,२७ } एप्रिल { २,३,१२,१३,१४,१५}
प्रतिकूल दिवस - मार्च { २०,२१,२८,२९ } एप्रिल  { ७,८,१६ }

मिथुन राशी : योग्य पथ्यपाणी करण्याने आरोग्यात सुधारणा होईल, नोकरीत नव्या जवाबदाऱ्या अंगावर पडतील. उद्योग धंद्यात जाहिरातींवर खर्च वाढवावा लागेल. यात्रा प्रवास यांचे योग्य येतील. मित्रांमध्ये अबोला वाद वाढेल. आर्थिक प्रकरणांमध्ये अडचणी येतील. शिक्षणात यश व प्रगती मिळेल . प्रवास सुखाचे घडतील.
अनुकूल दिवस - मार्च { १८,१९,२०,२१,२८,२९} एप्रिल {४,५,१४,१५,१६}
प्रतिकूल दिवस - मार्च { २२,२३,३१ } एप्रिल  { १,९,१०}

कर्क राशी :जुन्या मित्रमैत्रिणींची गाठभेट होईल. सहल अथवा यात्रेला जाण्याचे बेत ठरतील. नोकरीत कामाचा मोबदला चांगला मिळेल. कोरठची कामे समितीने मिटवा. धरणीक कार्यात खर्च वाढेल,  चैनीची प्रवृत्ती बळावेल, उद्योग धंद्यात काळजी पूर्वक लक्ष द्या, घरातील वाद वेळीच मिटवा, व्यवसाय उत्तम चालेल. स्थावराचा व्यवहार जमेल
अनुकूल दिवस - मार्च { २०,२१,२२,२३,३१ } एप्रिल { १,६,७,८}
प्रतिकूल दिवस - मार्च { २४,२५ } एप्रिल  { २,३,१२,१३ }

सिंह राशी : शरीर पीडा वाढेल. मनावर संयम ठेवा, भान ठेऊन पैसाखरच करा, घरातील वाद वेळीच मिटवा, मुलांच्या भविष्याची चिंता सातवेल , उद्योग धंद्यात थोडी मंडी जाणवेल, भागीदारीत व्यवहार टाळा, धार्मिक वृत्ती वाढेल , राहत्या जागेची डागडुजी कराल, जमिनीत लाभ मिळेल,
अनुकूल दिवस - मार्च { २२,२३,२४,२५ } एप्रिल { २,३,९,१०}
प्रतिकूल दिवस - मार्च { २४,२५ } एप्रिल  { २,३,१२,१३ }

कन्या राशी :  जुन्या मित्रमैत्रिणीं बरोबर सहलीची योजना आखाल, मनोबल वाढते राहील, उद्योग धंद्यात नव्या योजना लाभदायक ठरतील, दाव्यात अपयश येईल. रागावर नियंत्रण ठेवा, नोकरीत स्थिरता जाणवेल , विद्याभ्यासात यश मिळेल, शेतीत लाभ घडेल, घरातील लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील.प्रवासात कष्ट होईल
अनुकूल दिवस - मार्च { २४,२५,२६,२७ } एप्रिल {४,५,१२,१३}
प्रतिकूल दिवस - मार्च { २०,२१,२८,२९ } एप्रिल  { ६,७,८,१६ }


तूळ राशी :  प्रवासाच्या योजना आखाल , नोकरीत बॉसची मर्जी सांभाळून राहाल , मुलांच्या अडचनिंवर मार्ग काढण्याचा प्रयत्न कराल, आर्थिक प्राप्ती उत्तम राहील , मतभेदाच्या समेट घडूळ येईल, धंद्यात चढ उतार जाणवतील , आत्मविश्वास दुणावेल , ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला महत्वाचा ठरेल , प्रापंचिक सौख्य ठीक राहील , आरोग्य सुधारेल
अनुकूल दिवस - मार्च { १८,२६,२७,२८,२९.} एप्रिल { ६,७,१४,१५ }
प्रतिकूल दिवस - मार्च { २२,२३,३१} एप्रिल { १,९,१० }

वृश्चिक राशी : आरोग्यासाठी पथ्यपाणी करणे आवश्यक राहील, उद्योग धंद्यात वाढ करू नका ,  अडचणीला मित्रांची मदत मिळणार नाही, अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल , नोकरीत मनाविरुद्ध बदल घडेल , वाहन चालवताना खबरदारी घ्या, वाहन खर्च वाढेल , मुलांच्या अडचणी समजून घ्या , संसारात वाद वाढतील , मोठी गुंतवणूक सध्या नको.
अनुकूल दिवस - मार्च {२०,२१,२८,२९,३०,३१्} एप्रिल { १,९,१०,१६ }
प्रतिकूल दिवस - मार्च { २४,२५ } एप्रिल  { २,३,१२,१३ }

धनु राशी : उष्णतेचे आजार उध्दभवतील, मनावरील दडपण वाढेल , वास्तूचे व्यवहार लांबणीवर टाका , मित्रांमध्ये चेष्टा मस्करी नको , नोकरीत दगदग वाढेल , धंद्यामध्ये नावीन्य आणावे लागेल , भागीदारीवर अवलंबून राहू नका , भाऊबंदकी वाढेल , अभ्यासात यश येईल , प्राप्ती बारी राहील मुलांची प्रगती उत्तम राहील,
अनुकूल दिवस - मार्च { २२,२३,३१} एप्रिल { १,२,३,१२,१३ }
प्रतिकूल दिवस - मार्च {१८,१९,२६,२७ } एप्रिल  { ४,५,१४,१५ }

मकर राशी : सामाजिक कार्यात मान सन्मान मिळेल , यात्रा सहल यांचा योग्य जुळून येईल , व्यवहारात प्राप्ती बारी राहील , नव्या आर्थिक व्यवहाराला चालना मिळेल , रोजगाराची संधी उपलब्ध होईल , स्थावरचे व्यवहार जाणकाराच्या सल्ल्याने करा , न्यायालयीन प्रकरण त्रासाचे बनेल , वाहन बेफिकीर पाने चालवू नका , धंद्यात काळजी वाढेल , शिक्षणात अडचणी आणि   प्रपंचात कटकटी वाढतील
अनुकूल दिवस - मार्च { १८,१९,२४,२५ } एप्रिल { २,३,४,५,१४,१५}
प्रतिकूल दिवस - मार्च {२०,२१,२८,२९ } एप्रिल  { ६,७,८,१६ }

कुंभ राशी : जनसंपर्कातून ओळख व कीर्ती वाढेल , बेकारांची भ्रमंती थांबेल डोळ्यांचे आजार अथवा उष्णता यापासून त्रास होईल , नोकरीत जबाबदारी वाढेल , हातातील काम मनाला सुखावून जाईल . घरात धार्मिक कार्य घडेल , घरातील वातावरण सौख्याचे असेल , उद्योग प्रगती पथावर राहील , रेंगाळलेली कामे मार्गी लागतील .
अनुकूल दिवस - मार्च { २०,२१,२६,२७} एप्रिल { ४,५,६,७,८,१६ }
प्रतिकूल दिवस - मार्च {२२,२३,३१ } एप्रिल  { १,९,१० }

मिन राशी : आरोग्य चांगले राहील , धंद्यात प्राप्ती बेताची असेल , नोकरी कामात जिकीरी जाणवेल , मन चिंतातुर बनेल , भागीदारीबरोबर वाद संभवतात , पती पत्नींमध्ये गैरसमज निर्माण होतील , अचानक धनलाभ घडेल , पित्ताचे विकार वाढतील , अध्यात्माकडे ओढ वाढेल संततीस त्रास होईल जमनीचे व्यवहार फायद्याचे ठरतील
अनुकूल दिवस - मार्च { २२,२३,२८,२९ } एप्रिल { ६,७,८,९,१० }
प्रतिकूल दिवस - मार्च {२४,२५ } एप्रिल  { २,३,१२,१३ }

अधिक माहिती साठी संपर्क 
या फेसबुक प्रोफाइल ला फॉलो करा क्लिक करा इथे 
राणे गुरुजी ( पालघर  ) 
८१४९३५७८९०
क्लीक करा इथे 

शुक्रवार, २ मार्च, २०१८

जाणून घ्या मार्च २०१८ महिन्याचे भविष्य

                                                                        ।।श्री ।।
 राशी भविष्य मार्च  २०१८


मेष राशी : सध्याचे ग्रहमान मेष राशीच्या लोकांसाठी चांगले आहे . थोरामोठ्यांचा सल्ला घेऊन वाटचाल यशस्वी होईल . चैनीचे खर्च कमी करा. गृहिणींना वाढता कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. 

वृषभ राशी : नेहमी प्रत्येक बाब पैशात मोजायची नसते , हे जाणून वागाल तर यश युमच्याच पदरी पडेल . सोपवलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पडेल . कामाचा बोजा वाढला तरी कार्यपूर्ततेचा आनंद सुखावून जाईल 

मिथुन राशी: या महिन्यात जर तुम्ही तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा असे या महिन्याचे सांगणे आहे , मंगल आर्थिक स्थिती खालावू देणार नसला तरी , आर्थिक व्यवहार मात्र काळजीपूर्वक करा . महत्वाच्या कागदपत्रांवर साह्य करताना कोणावरही विश्वास ठेवू नका .

कर्क राशी: " रागावे ताबा " हेच या महिन्याचे सूत्र ठेवले तर बऱ्याच अडचणी दूर होतील . या महिन्यात कोण आपले आणि कोण परका हे तुम्हाला कळून येईल महिलांनी आर्ग्याची काळजी घ्यावी .

सिंह  राशी: संयम ठेवून वागलात तर बाजी मारून न्याल . उतावीळ पणामुळे जुळत आलेली गणिते बिघडू शकतात . झालेल्या चुकांचा अभ्यास करून निर्णय घ्या . सरशी तुमचीच होईल . सध्यातरी कर्ज काढू नका .

कन्या राशी: या महिन्या त मनाप्रमाणे कामकाज पार पाडता येईल , मात्र थोडा अधिक वेळ आणि शक्ती खर्च करावी लागेल , धनप्राप्तीचे योग चालून येतील नवीन आव्हानांना सामोरे जाणे सुकर होईल . कार्यालयीन कामासाठी प्रवास संभवतो .
                         राणे गुरुजी 
                                          हस्तलिखित जन्म कुंडली बनवून मिळेल 
                                          ज्योतिष विषयक सल्ला मिळेल 
                                          गुण मिलन करून मिळेल


तूळ राशी: व्यक्तिगत अथवा कार्यालयीन पातळीवर आपल्या कुठल्याही ताणतणावांचा अंदाज समोरच्या व्यक्तीला येणार नाही असे वागा . सकारात्मक धोरण अवलंबा . कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका . 

वृश्चिक राशी : पैशाचे प्रश्न कोणाला सतावत नाहीत ? सध्या आर्थिक बाबतीत तुम्हालाही  त्रास सहन करावा लागणार आहे, आपल्या विश्वासू व्यक्तींकडून सध्यातरी मोठ्या अपेक्षा न ठेवणे हितावह ठरेल . घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या .

धनु राशी : तुमच्या कामकाजात लक्षणीय सुधारणा होण्याचा काळ आहे . ग्रहमानाची अनुकूलता आणि तुमचे कर्तृत्व यांची योग्य सांगड घातल्यास यशाची कमान उंचावेल . हाती घेतलेल्या कार्यास गती मिळेल . पित्ताचे विकार संभवतात .

मकर राशी : घर आणि कार्यक्षेत्र या दोन्ही ठिकाणी तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे . कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांवरील अति विश्वास प्रसंगी हानिकारक ठरेल . कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ संभवते.

comp कुंभ राशी ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे , व्यवसायात नव्या योजना कार्यान्वित करू शकाल . प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका , नवीन ओळखीत व्यवहार टाळावा , उत्तरार्ध चांगला आहे कौटुंबिक सौख्य लाभेल .

मिन राशी : तुमची धोरणे तेवढी कठोर नसतात , परंतु समोरचा त्याचा गैर फायदा तर घेत नाही ना याची खबरदारी घ्या एखादा जोड धंदा सुरु करता आला तर फायदेशीर असेल 


तुमचे मत कंमेंट्स मध्ये जरूर नोंदवा आणि आवडले तर शेयर जरूर करा                     
                                                             
अधिक माहिती साठी संपर्क 
राणे गुरुजी ( पालघर  ) 
८१४९३५७८९०
क्लीक करा इथे