ऍड

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०१८

राशी भविष्य फेब्रुवारी २०१८

                                                                            ।। श्री ।।
                                                  राशी भविष्य फेब्रुवारी २०१८


मेष राशी :     ह्या महिन्यात ग्रहमानाची अनुकूलता असल्याने तुम्ही तुमचे विचार समोरच्या व्यक्तीला पटवून देण्यात यशस्वी व्हाल . कार्यक्षेत्रात काही नवीन जबाबदाऱ्या  स्वीकाराव्या लागतील , कामानिमित्त प्रवास संभवतो , प्रकृती सांभाळा .

वृषभ राशी: ग्रहमानाकडून फारशी साथ नाही ' जसा वारा तसे शीड ' अशी भूमिका सध्या घ्यावी लागेल , काही प्रसंगी तुम्हाला खोटे पाडण्याचा प्रयत्न होईल , विचलित होऊ नका .शेवटी तुम्ही यशस्वी व्हाल .

मिथुन राशी : सध्या तुम्हाला थोडे अधिक सतर्क राहून विरोधकांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे . खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे कठीण जाईल . व्यासायिक भागीदारांशी काहीसे मतभेद होण्याची शक्यता संभवते . त्यांचाही प्रस्ताव विचारात घ्या.

कर्क राशी : या महिन्यात आप्तेष्टा बरोबर मतभेद, वादविवाद संभवतात.यात तुमचा वेळ आणि शक्ती नाहक खर्च होईल . उत्तार्धात नोकरी व्यवसाय क्षेत्रात अपेक्षित प्रगती साधता येईल . सामाजिक कार्यात सहभागी व्हाल .

सिंह राशी : यशाची कमान उंचावणारा हा माही ना आहे . मात्र मनावर नियंत्रण  ठेवावे लागेल . नोकरी -व्यवसायातील आपल्या नव्या योजनांबाबत अधिक सतर्क राहा . विरोधकांना याचा सुगावा लागणार नाही याची दक्षता घ्या .

कन्या राशी : नोकरदार व्यक्तींना आव्हानात्मक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील . सचोटीने काम पार पाडलेत तर यश पदरी पडणारच . खोट्या प्रलोभनांना  बळी  पडू नका . उत्तरार्धात धनप्राप्ती चांगली होईल .

                                                        राणे गुरुजी 
                                          हस्तलिखित जन्म कुंडली बनवून मिळेल 
                                          ज्योतिष विषयक सल्ला मिळेल 
                                          गुण मिलन करून मिळेल 






तूळ राशी : छोट्या छोट्या कामांत अधिक वेळ, शक्ती आणि पैसा खर्च होण्याची शक्यता ह्या महिन्यात संभवते . संयमाने व गोड  बोलून कामे पूर्ण करून घ्या . मित्रपरिवारात सध्यातरी आर्थिक व्यवहार करू नका .

वृश्चिक राशी : हाताखालच्या लोकांवर थोडे अधिक लक्ष द्या , असेच या महिन्याचे तुम्हाला सांगणे आहे , पद प्रतिष्ठेचा  अधिक बाऊ न करता , कर्तव्यदक्ष राहिलात तर इप्सित साध्य करू शकाल . कामानिमित्त प्रवास संभवतो .

धनु राशी : तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराकडून सहकार्याची अधिक अपेक्षा ठेऊ नका , उत्तरार्ध उत्साहवर्धक राहील , वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील , धनप्राप्तीचे योग संभवतात , नेत्रविकारावर त्वरित उपाय योजा.

मकर राशी : ' कार्यात एकाग्रता आणि जिद्द वाढावा असे ग्रहमानाचे तुम्हाला सांगणे आहे प्राकृतिक अस्वस्थतेचा आपल्या कामावर परिणाम होऊ देऊ नका . तुमच्या शब्दांचा गैरअर्थ निघणार नाही याची काळजी घ्या

कुंभ राशी : एखाद्या अनपेक्षित बाबीमुळे अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे . वाढती आवक तुमचा आत्मविश्वास वाढवेल . पित्ताच्या आणि अपचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको, कौटुंबिक वाद वाढू येऊ नका .

मीन  राशी : व्यवसायात लाभ व नोकरीत पदोन्नती होण्याचा सध्याचा काळ आहे . " सिर  सलामत तो पगडी पचास " या न्यायाने नवीन आव्हानांस सामोरे जाताना प्राकृतिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका , खर्च कसा आटोक्यात राहील ते पहा .

जाणून घ्या कसे कराल महादेवाला प्रसन्न घरच्या घरी 

तुमचे मत कंमेंट्स मध्ये जरूर नोंदवा आणि आवडले तर शेयर जरूर करा                       
                                                               
अधिक माहिती साठी संपर्क 
राणे गुरुजी ( पालघर  ) 
८१४९३५७८९०
क्लीक करा इथे 



                                                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा